| खांब | प्रतिनिधी ।
पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जय बजरंग रोहा खो-खो संघाचा अनुराज योगेश ठाकूर याची सोलापूर येथे होणाऱ्या 52 व्या महाराष्ट्र राज्य कुमार गट अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कुमार गट संघात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अनुराजची सलग दुसऱ्या वर्षी रायगड जिल्हा संघात निवड झाली असून मागील वर्षी देखील त्याने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. सातत्यपूर्ण सराव, मेहनत, फिटनेस व उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा जिल्हा संघात आपले स्थान कायम राखले आहे. जय बजरंग रोहा खो-खो संघाच्या माध्यमातून अनुराजने अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या निवडीबद्दल जय बजरंग क्रीडा मंडळ रोहा तसेच परिसरातील क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केलेआहे.
अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड
