नवी मुंबईतील वाशीजवळील एपीएमसी फळ मार्केटला आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. 17) दुपारच्या सुमारास घडली. बाजारातील फळांच्या पॅकिंगसाठी लागणार्या लाकडी पेट्या, कागदी पुठ्ठा आणि खोके विक्री करणार्या गोडाऊनला दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या सुमारे 10 गाळे आगीच्या भक्ष्य स्थानी पडले असल्याची माहिती मिळत आहे. आगीत 18 ते 20 व्यापार्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नवी मुंबई अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. संध्याकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
वाशीतील एपीएमसी बाजारात फळ मार्केटच्या आवारात अनधिकृतपणे फळांना पॅकिंग करण्यासाठी कागदी पुठ्ठा, लाकडी पेट्या, प्लास्टिकचे कॅरेट विक्री करणारी दुकाने आहेत. आज गुरुवारी दुपारच्या सुमारास एन-964 या गाड्यांचे पाठीमागे असणार्या एका गोडाऊनला अचानक पणे आग लागली. या ठिकाणी असणारे कागदी लगद्याने पेट घेतल्यानंतर ही आग अधिक वाढत जात नजीकच्या लाकडी पेट्या ठेवण्यात आलेल्या दुकानांना देखील लागली. त्यानंतर याआधीने एक एक करून इतर दुकाने आपल्या विळख्यात घेतले. लाकडी आणि कागदी साहित्य त्याचप्रमाणे प्लास्टिकचे साहित्य गोण्या असल्याने आगीने काही वेळातच गाळ्यांना घेतले.
या ठिकाणी असणार्या व्यवसायिकांनी कागदी आणि पुठ्ठे बाजूला काढण्याचे काम सुरू केले, त्यानंतर घटनास्थळी वाशी अग्निशामक दलाच्या जवानांनी पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीचा वेग वाढतच गेल्याने इतर तीन गाड्या घटनास्थळी बोलवण्यात आल्या. त्यानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी दिली. या की प्राथमिक माहितीनुसार चार गाळे पूर्णपणे भस्मसात पडले आहे तर इतर 10 गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
फळ मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. फळे पॅकिंगसाठी वापरल्या जाणार्या अनेक लाकडी पेट्या आणि पुठ्ठ्याचे डबे पसरलेले आहेत, त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. घाऊक बाजारातील अशा अतिक्रमणांना आळा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल अग्निशमन विभागाने एपीएमसी प्रशासन आणि तुर्भे वॉर्ड अधिकार्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे मागणी आरटीआय कार्यकर्ते अनरजित चौहान यांनी केली आहे.
अनधिकृत गाळे; सुरक्षा यंत्रणेचा अभाव
एपीएमसी फळबाजारात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे जागेचा वापर करीत गाळे उभारण्यात आले आहेत, मात्र या अनधिकृत गाळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अग्निशामक सुरक्षा यंत्रणा नसल्याने ही आग वाढल्याचे व्यापार्यांनी सांगितले. एपीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात विनापरवाना व्यवसाय करणारे व्यापारी आणि अनधिकृत गाळे एपीएमसी बाजार संकुलात वाढत असल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी व्यापार्यांनी केली आहे.