पोलिसांची माफी माग, नाहीतर… पोलीस पत्नीचा इशारा

। अमरावती । वृत्तसंस्था ।

सर्वांची माफी माग, नाहीतर तुला सोडणार नाही, असा इशारा पोलिसाच्या पत्नीने खासदार नवनीत राणा यांना दिला आहे. लव्ह जिहाद झाल्याचा आरोप करत राणा यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता.

अमरावतीतील एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप भाजप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. मुलीचा भाऊ खासदार राणा यांच्याकडे बुधवारी सकाळी मदत मागण्यासाठी आला. लव्ह जिहाद प्रकरणातून अशा मुलीचं अपहरण करून धर्मांतर केलं जातंय, असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नवनीत राणा यांनी पोलिसांना फोन केला असता काही मिनिटांनी हा कॉल रेकॉर्ड करण्यात आला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. पोलिसांनी लोकप्रतिनिधींचा फोन कोणत्या अधिकाराखाली रेकॉर्ड केला, असा सवाल करत नवनीत राणा आक्रमक भूमिका घेतली होती.

Exit mobile version