| पनवेल | वार्ताहर |
विविध गुन्ह्यातील जप्त तसेच बेवारस वाहनांची ओळख पटविण्याचे आवाहन पनवेल तालुका पोलिसांनी केले आहे. गुन्ह्यातील जप्त व बेवारस 12 दुचाकी व 8 चार चाकी अशी एकूण 20 वाहने बर्याच कालावधीपासून पोलीस ठाण्याच्या आवारात तसेच ईएमसी तळोजा येथील वाहनतळ येथे जमा आहेत. ही वाहने गुन्ह्यातील, अपघातातील व बेवारस पडून आहेत. त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी या वाहनांची ओळख पटवावी, असे आवाहन वपोनि अनिल पाटील यांनी केले आहे.