। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील नरिमन पाईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ या विशेष सोहळ्याचे आयोजन अफ्टरनून व्हॉईस व रेड अँट ब्रँड प्रमोशन यांच्याकडून करण्यात आले होते. या सोहळ्यात पोलादपूरच्या रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा धारवलीचे मुख्याध्यापक प्रदिप राजाराम पवार यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर व सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात विधितज्ञ अॅड. उज्वल निकम, गहिनीनाथ औसेकर, डॉ. वैदेहि तामन, फौंडर ऍन्ड चीफ ऑफ आफ्टरनून व्हॉईस व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.