। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली, पनवेल परिसरात सोनसाखळी चोरीच्या प्रकारांत वाढ झाली असून महिला वर्गाने प्रतिबंध, सतर्क राहावे असे मार्गदर्शनपर परिपत्रक कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात घेतलेल्या महिला मंडळाच्या बैठकीत आवाहन केले. तसेच महिलांनी जागृत राहण्याचे आवाहनही या वेळी पोलिसांनी केले. सोनसाखळी चोरांबाबत माहिती देऊन प्रतिबंध होण्यासाठी सूचना दिल्या, तसेच परिपत्रक वाटप करून आजूबाजूचे महिलांना सांगण्याबाबत मार्गदर्शन केले. हद्दीतील सर्व पूजेचे ठिकाणी महिलांना परिपत्रक वाटप केले. आता मॉर्निंग वॉकला जाणार्या नागरिकांकडून चोरट्यांनी लक्ष वळविले असून अशा नागरिकांनाही परिपत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.