स्व-जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

| तळा | प्रतिनिधी |

राज्यात 1 मेपासून जनगणना उपक्रम राबविण्यात येत आहे. जनगणना 2027 ही जनगणना जवळपास अनेक वर्षानी होत असून 1 मे ते 15 मे या कालावधीत मोबाईलवर https://se.census.gov.in या लिंकवर स्व-जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करावे. 16 मे ते 14 जून घरोघरी जनगणना केली जाणार असून प्रगणक, पर्यवेक्षक घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील. त्यांनी विचारलेल्या प्रश्रांची व्यवस्थित माहिती भरून द्यावी. या जनगणनेने देशाच्या विकासाला गती मिळेल. ‘चला तर आपली जनगणना जबाबदारी पार पाडू या, जनगणनेत सहभागी होवू या,’ याप्रमाणे प्रशासनाला सहकार्य करावे. शासनाची योजना आखणी शिक्षण, आरोग्य, संसाधन वाटप रोजगार, पायाभूत सुविधा यासाठी आवश्यक ठरणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे तळा तहसीलदार स्वाती पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

Exit mobile version