स्वाधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करा

। अलिबाग । वार्ताहर ।
शासनाने संकटग्रस्त पिडीत महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वाधारगृह योना राज्यात कार्यान्वित केली आहे. त्यानुषंगाने महिला व बालविकास क्षेत्रात कार्य करणार्‍या सर्व स्वयंसेवी संस्थांनी स्वाधार योजना राबवू इच्छिणार्‍या संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह आपले प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तात्काळ सादर करावेत असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रविण पाटील यांनी केले आहे. सदरची योजना राबविण्याकरीता इच्छुक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी, संस्था नीती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी.

Exit mobile version