ॲड गायकवाडांची नियुक्ती

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते ॲड उत्तम गायकवाड यांची आरपीआय आठवले गटाच्या युवक आघाडीचे प्रदेश संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी, राज्य कार्यकारिणी मध्ये कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते ॲड उत्तम गायकवाड यांना प्रदेश युवक आघाडी मध्ये संघटक बनविले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे यांनी ॲड गायकवाड यांना नियुक्ती पत्र दिले. त्यावेळी युवक आघाडी चे राज्य सरचिटणीस डॉ. विजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version