शिंदे गटाला धक्का! भरत गोगावलेंची नेमणूक बेकायदेशीर

। मुंबई । प्रतिनिधी ।
गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद करण्यात आला. यानंतर आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात येणार आहे.

या निकालावर राज्यातल्या शिंदे सरकारच्या भवितव्यावरही या निर्णयाचा परिणाम होणार असल्यामुळे त्याच्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. या संपूर्ण निकालामध्ये शिंदे गटाला जोरदार धक्का लागला असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version