। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राजन नारायण सांबरे (शीळ ) यांना सहाय्यक आयुक्त कोकण विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई येथे बढती देण्यात आली.
सांबरे हे पंचायत समिती म्हसळा येथे शिक्षण विभागात वरिष्ठ विस्तार अधिकारी,प्रभारी गटशिक्षणाधिकारी,प्रभारी गटविकास अधिकारी,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हसळा,श्रीवर्धन, पनवेल येथे अतिशय उत्तम प्रकारे प्रशासकीय जबाबदारी पार पाडली आहे. सांबरे शैक्षणिक,सामाजिक, क्रीडा इत्यादी क्षेत्रात नाविण्यपणे काम केले असून त्यांची एक वेगळी छाप प्रशासकीय सेवेत दिसून येते. एक हक्काचा अधिकारी वरिष्ठ जागी नियुक्ती झाल्यामुळे राजन सांबरे यांचे जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.