। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
पाली-सुधागड येथील राजेंद्र राऊत यांची शिवसेना रायगड उपजिल्हा संघटकपदी तर पाली शहर प्रमुखपदी ओमकार खोडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व शिवसेना संपर्कप्रमुख बबन पाटील यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आले.
या नियुक्तीबद्दल विलास चावरी, मनोहर भोईर, अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, अविनाश म्हात्रे, विष्णू पाटील, दीपश्री पोटफोडे, मिलिंद देशमुख, रमेश सुतार, निलेश अवसरे, अश्विनी रुईकर आदींनी शुभेच्छा दिल्या.
राऊत, खोडागळे यांची शिवसेनेकडून नियुक्ती
