शेकापच्या महिला आघाडीच्या नियुक्त्या जाहीर

| पनवेल | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष पनवेलमध्ये पनवेल जिल्ह्याच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये नवनियुक्त महिला आघाडीच्या नियुक्त जाहीर करण्यात आल्या. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या महिला जिल्हा संघटक म्हणून राजश्री बाळाराम पाटील, जिल्हाध्यक्ष म्हणून अनुराधा ठोकळ, उपाध्यक्षपदी गुलाब पाटील, जिल्हा सचिवपदी प्रज्योती म्हात्रे, जिल्हा खजिनदार पुष्पलता मढवी, सल्लागारपदी माधुरी गोसावी सहसंघटिका उषा तांडेल, सह संघटिका मीरा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली. याचवेळी पनवेल विभागातील प्रभाग निहाय महिला अध्यक्ष आणि महिला आघाडीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. या कार्यक्रमात त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमासाठी ममता म्हात्रे, नगरसेविका सुरेखा मोहकर, प्रणाली भोईर, अरुणा दाभणे, गौरी शिंदे, रेणुका मोहकर, उषा तांडेल, मान्यवर उपस्थित होत्या.

याप्रसंगी मानसी पाटील हिचा विशेष सत्कार करण्यात आला. मानसी पाटील या माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या तिसरी पिढी असून तिला शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यार्थिसेल जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version