अनिल राऊत यांची कौतुकास्पद कामगिरी

| गडब | वार्ताहर |

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे राष्ट्रीय कबड्डी पंच अनिल राऊत यांनी महाराष्ट्र राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सलग चार वर्ष अंतिम सामना खेळविण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

अनिल राऊत यांनी चिपळुन रत्नागिरी येथे झालेली 68 वी महाराष्ट्र राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर विरुध्द रत्नागिरी, 69 वी स्पर्धा मुंबई शहर विरुध्द अहमदनगर, 70 वी स्पर्धा मुंबई शहर विरुध्द अहमदनगर व 71 वी स्पर्धा पुणे ग्रामिण विरुध्द अहमदनगर हे अंतिम सामना खेळविण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अनिल राऊत यांनी खेळो इंडीया कबड्डी स्पर्धा बेंगलोर, अखिल भारतिय पोलिस कबड्डी स्पर्धा, अखिल भारतिय विद्यापिठ स्पर्धा, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा रोहा आणि अहमदनगर, अखिल भारतिय स्तरावरील तसेच राज्यस्तरीय जिल्हास्तरी कबड्डी स्पर्धांमध्ये पंचाची सर्वोत्कुष्ट कामगिरी केली असुन या स्पर्धांमधे उपउपांत्य, उपांत्य व अंतिम सामने खेळविले आहेत.

अनिल राऊत यांची सातत्यपुर्ण यशस्वी कामगिरी पाहाता त्यांना राज्य अंजिक्यपद कबड्डी स्पर्धेत सलग चार वेळा अंतिम सामना खेळविण्याची संधी मिळाल्याबद्दल व त्यांनी ही जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल त्यांचे रायगडजिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच आदींनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version