| पनवेल | प्रतिनिधी |
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील ब्राह्मणी गावातील चार वर्षाची कन्या राशेश्वरी रमेश जाधव ही आपल्या आई-वडिलां सोबत नर्मदा परिक्रमा करत आहे. या लहान मुलीच्या जिद्द आणि परिश्रमाला दाद देत तिचे प े माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे यांनी विशेष कौतुक करत तिला या परिक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रमेश जाधव व अर्चना जाधव यांची चार वर्षाची कन्या राशेश्वरी हिने दोन वेळा ही परिक्रमा गाडीने पूर्ण केली आहे. तिच्या आई-वडिलांनी 2 दोन वेळा नर्मदा पायी परिक्रमा केली आहे.
राशेश्वरी जाधव ही कन्या तीन महिन्यापासून नर्मदा परिक्रमासाठी निघाली आहे. आत्तापर्यंत तिने अडीच हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण केले असून अजून तिला 1000 किलोमीटर चा प्रवास बाकी आहे. ही मुलगी दररोज 25 ते 30 किलोमीटर चालत असून लवकरच ती नर्मदा परिक्रमा पूर्ण करेल. ती ज्या ठिकाणी जाते तेथील नागरिक तिचे कौतुक करीत असून तिच्या वाटचालीस शुभेच्छा देत आहेत. नर्मदा मैया चे स्वरूप म्हणजे बाल स्वरूप मानले जाते. ही सगळी मायेची नर्मदा मायाची शक्ती आहे म्हणून चार वर्षाची राशेश्वरी जाधव नर्मदा परिक्रमा आपल्या आई-वडिलांसोबत पूर्ण करत आहे.