पोलिसांचे कौतुक! घरफोडी करणारा गजाआड

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे घरफोडी करून जवळपास 93 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास करणार्‍या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे.

चिंध्रण येथील उदय कडू यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडी कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील बेडरूम मधील कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवलेले जवळपास 93 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार पनवेल तालुका पोवीस ठाण्यात करण्यात आली होती. त्या तक्रारी नुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक खेडकर, सहा.पोलीस निरिक्षक अविनाश पाळदे, पो. हवा सूर्यवंशी, पोना मोकल, पोशी भोये, खताळ, जयदीप पवार, सचिन होळकर आदींच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या आधारे तसेच तांत्रिक तपासाद्वारे आरोपी उदय कडू (32) याची माहिती मिळाली त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Exit mobile version