भगवती बंदर क्रुझ टर्मिनलला मंजूरी

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

शहरातील भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनलला अखेर मंजूरी मिळाली आहे. तसा अध्यादेश शासनाकडून शुक्रवारी (दि.23) जारी करण्यात आला आहे. यामध्ये 302 कोटी 42 लाख 10 हजार रक्कमेचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे. लवकरच मुंबई ते गोवा जलमार्गावर जलेश व आंग्रीया या क्रुझला थांबा मिळणार आहे. यामुळे पर्यटकांना कोकणातीलल निसर्गसौंदर्य आणि पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येणार आहे.

रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून साधारण 19 कि.मी. अंतरावर भगवती बंदर आहे. जवळच विमानतळ देखील आहे. सद्यस्थितीत मुंबई ते गोवा अशी फेरी सेवा जलेश व आंग्रीया या क्रुझद्वारे सुरु आहे. मुंबई ते गोवा जलमार्गावर महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीमध्ये कोठेही थांबा नसल्यामुळे पर्यटकांना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील पर्यटनस्थळे पाहता येत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी पर्यटनस्थळे ही भगवती बंदराच्या आसपास आहेत. यामुळे भगवती बंदर येथे सुसज्ज असे क्रुझ टर्मिनल विकसीत केल्यास पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. परीणामी स्थानिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

Exit mobile version