। पनवेल । वार्ताहर ।
महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार दोन वर्षासाठी वार्षिक मंजुर दराने पनवेल महानगरपालिका मालकीच्या सर्व सार्वजनिक शौचालयांची निगा, दुरुस्ती व नुतनीकरण करणेबाबतच्या विषयास महासभेने मंजूरी दिली.महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे 6 जुलै रोजी पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यावरची पहिल्या पंचवार्षिकमधील शेवटची महासभा घेण्यात आली. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, आयुक्त गणेश देशमुख, महापालिकेचे सर्व सदस्य, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.