। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषद मधील आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या दोन सफाई कामगार निवृत्त झालते. त्यांच्या मुलांना वारसा पध्दतीने नगरपरिषद मध्ये सेवेत नियुक्त करण्यात आले, तसे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले.नगरपरिषदेच्या आस्थापनेवर अशोक रणदिवे व सुभाष सोनावणे हे आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून काम करत होते. त्यांच्या सेवा निवृत्तीनंतर त्यांना लाड पागे कमिटीच्या शिफारशीनुसार वारसा पद्धतीने आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे, हे नियुक्ती पत्र नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी अशोक ओसवाल, बळवंत घुमरे, जितेंद्र गोसावी, अविनाश पवार, मनिष गायकवाड,सुदाम म्हसे यावेळी उपस्थित होते