ह्रदय शस्त्रक्रिया उपकरणांच्या खरेदीसाठी निधी मंजूर

। मुंबई । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ह्रदय शस्त्रक्रिया करण्यासाठी येणारे रुग्ण मशीन बंद असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णलयात जीव वाचविण्यासाठी महागड़े उपचार करून घ्यावे लागतात. मात्र याची दखल सरकार दरबारी घेत नसल्यामुळे गरीबांचे हाल होतात. यासाठी सरकारने जे.जे. आणि जीटी रूग्णालयांसाठी 19 कोटी रूपयांची आधुनिक वैद्यकीय उपकरणे घेण्यास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंजुरी दिली आहे.

त्यानी जे.जे., कामा, जीटी रूग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन वैद्यकीय यंत्रसामग्रीची पाहणी केली होती त्यावेळी जे.जे. रूग्णालयात हृदय शस्त्रक्रिया विभागातील जिओग्राफी व न्जिओप्लास्टी करणारी यंत्रे तसेच जीटी रूग्णालयात स्कॅनर मशीन व एमआरआय मशीन जुनी झाल्याने तातडीने नवीन मशीन खरेदीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले होते.

Exit mobile version