। पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल तथा पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका चंद्रकला शेळकेयांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचा एकूण 90 लोकांनी लाभ घेतला असून, यापैकी 34 नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात पाठविण्यात आले.
या शिबीरास शंकरा आय हॉस्पिटलचे विश्वस्त तथा व्यवस्थापक डॉ. सचिन भूमकर, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, अरुण भगत, दशरथ म्हात्रे, माजी सरपंच शशिकांत शेळके, सचिन गायकवाड, शंकुनाथ भोईर तथा आसुडगांव ग्रामस्थ उपस्थित होते.