। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असताना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात लसीकरणाचा वेग वाढत असताना आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने करोनावरील आणखी दोन लसींना एकाच दिवशी मंजुरी दिली आहे. तसंच गोळीच्या वापरालाही मंजुरी देण्यात आली आहे.
देशात नवीन वर्षात म्हणजे जोनावारीच्या सुरवातीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे. 3 जानेवारीपासून हे लसीकरण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा सरकारचा मोठा निर्णय आहे. केंद्र सरकारने करोनवारील कॉर्बेवॅक्स आणि कोवोवॅक्स या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी एकाच दिवसात मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिलीय. यासोबतच व्हायरसविरोधी औषध मोलनुपिरावीरलाही मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज ट्विट केले आहे. सर्व नागरिकांचे अभिनंदन. करोनाविरुद्धच्या लढाईत आणखी एक भक्कम पाऊल टाकत, आम्ही कॉर्बेवॅक्स लस आणि कोवोवॅक्स लस या दोन लसींसह अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीरलाही मंजुरी दिली आहे. या औषधांना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे, असं मनसुख मांडवीय यांनी सांगितले.