लोटे औद्योगिक वसाहतीत जलवाहिनीला गळती

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याच्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. मात्र याकडे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून दुर्लक्ष होत आहे.
लोटे औद्योगिक संघटनेकडून पाणी वाचवा असा नारा दिला जात असताना औद्योगिक वसाहतीमध्ये भररस्त्यालगत पाईप लाईनच्या एअर वॉलमधून पाण्याची मोठी गळती लागली आहे. या वसाहतीमध्ये सतत फिरत असताना अधिकारी कर्मचार्‍यांना ही गळती कशी दिसत नाही? एअर वॉलच्या ठिकाणी गळत लागली की जाणूनबुजून केली गेली असे प्रश्‍न रहिवाशांकडून विचारले जात आहेत.
पुष्कर कंपनीच्या गेटसमोर अशी एअर वॉलच्या ठिकाणी गळती असून त्यावर प्लॅस्टीकही टाकले आहे. याठिकाणी ट्रक ड्रायव्हर व कामगार कपडे धुवत आहेत. महामंडळाच्या अधिकार्‍यांनी या पाणी गळतीचा शोध घेऊन त्यातून वाया जाणारे पाणी थांबवावे, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version