साव पावलो | वृत्तसंस्था |
अलेजांड्रो गोमेझने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर अर्जेटिनाने पॅराग्वेवर 1-0 अशी मात केली आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याचा सर्वप्रथम मान मिळवला.
इस्टाडिओ नॅशनल दी ब्राझिलिया स्टेडियमवर झालेल्या ङ्गअफ गटातील सामन्यात गोमेझने 10व्या मिनिटाला गोल नोंदवला. लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाच्या खात्यात तीन सामन्यांत सात गुण जमा असून ते गटात अग्रस्थानी आहेत. 29 जून रोजी होणार्या अखेरच्या साखळी सामन्यात अर्जेटिनाची बोलिव्हियाशी गाठ पडणार आहे. या लढतीत मेसी अर्जेटिनासाठी सर्वाधिक 148 सामने खेळणारा खेळाडू ठरेल.
अ गटातील अन्य लढतीत उरुग्वेने चिलीला 1-1 असे बरोबरीत रोखले. व्हर्गासने 26व्या मिनिटाला चिलीसाठी गोल केला, मात्र अर्टुरो विडालने 66व्या मिनिटाला स्वयंगोल नोंदवल्यामुळे उरुग्वेने बरोबरी साधली. तीन सामन्यांतून पाच गुणांसह चिली गटात दुसर्या स्थानी आहे, तर उरुग्वे बरोबरीच्या एका गुणासह चौथ्या क्रमांकावर आहे.