लहान बाळासह महिलांना जबर मारहाण
| बीड | वृत्तसंस्था |
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दरोडा घातल्याची भयंकर घटना घडली आहे. हा दरोडा एवढा भयंकर होता की या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. आष्टीतील केरळ गावातील भागवत वस्तीवर टाकण्यात आलेल्या या सशस्त्र दरोड्यात महिलांना जबर मारहाण करण्यात आली असून दरोडेखोरांनी दीड वर्षाच्या बाळालाही सोडलं नाही. महिलांच्या अंगावरील सर्व दागिने लंपास करत निर्दयी दरोडेखोरांनी आणखी चार जणांना बेदम मारहाण केली आहे. दरम्यान या घटनेने सध्या परिसरात मोठी दहशत पसरली असून पोलीस प्रशासनाचा मोठा फौज फाटा या ठिकाणी दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास करत आहे.