भोईघर येथे लष्कर भरती मार्गदर्शन

। अलिबाग । शहर वार्ताहर ।
नेहरू युवा केंद्र रायगड-अलिबाग आणि ओएसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुपग्रामपंचायत भोईघर यांच्या सहकार्याने आज, सोमवारी मुरूड तालुक्यातील भोईघर येथे लष्कर भरती मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. भोईघर पंचायतीच्या सभागृहात 10 ते 12 दरम्यान हा कार्यक्रम संपन्न होणार असून, यामध्ये भारतीय लष्करात सेवा देणार्‍या निवृत्त अधिकारी यांचे मार्गदर्शन उपलब्ध करण्यात आले आहे.

Exit mobile version