| सुकेळी | प्रतिनिधी |
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि रायगड जिल्हा क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा माणगाव-निजामपूर येथील बी.टी. स्पोर्टस ॲकेडमीच्या जलतरण तलावावर पार पडली असून, या स्पर्धेत रोहा येथील जे.एम. राठी स्कुलचा अर्णव सकपाळ याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये प्रथम, तर 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता कायम टिकवून ठेवत त्याने आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. कुमार अर्णव याला प्रशिक्षक भूषण शिर्के यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. अर्णवच्या या जिल्हास्तरावरील प्राविण्यानंतर त्याची आता विभागीय पातळीवर अधिकृत निवड झालेली आहे. त्यामुळे त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वच ठिकाणाहून कौतुक होत आहे.







