अक्षया नाईक यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
लायन्स क्लब ऑफ अलिबाग, अलिबाग नगरपरिषद, लायन्स क्लब अलिबाग डायमंड, लायन्स क्लब अलिबाग-मांडवा, आगरी सामाजिक संस्था आणि कच्छी भवन ट्रस्टच्यावतीने ‘ऑक्टोबर सेवा सप्ताहा’निमित्त अलिबागमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रांतपाल प्रवीण सरनाईक यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णांना जीवनदान देणारे सेवाकार्य आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीतील माता तसेच विविध आजारांवरील उपचारादरम्यान रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गरज लक्षात घेऊन लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. तसेच, या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 50 बॉटल रक्त जमा करण्यात आले. यावेळी माजी प्रांतपाल सुभाष भालवाल, जीएसटी समन्वयक अनिल म्हात्रे, झोन चेअरमन प्रदीप नाईक, श्रीकांत ओसवाल, अलिबाग नगरपरिषदेच्या उपसभापती अश्विनी ठोसर, आगरी सामाजिक संस्थेचे निलेश पाटील, लायन्स क्लबचे मान्यवर व पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.







