| उरण | प्रतिनिधी |
अर्णव प्रकाश पाटील याने करंजा ते अटल सेतू असे तब्बल 24 किलोमीटरचे समुद्री अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. या त्याच्या जलयात्रेच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उरण तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. अर्णवने समुद्रात तब्बल सात तास, दहा मिनिटे, वीस सेकंद पोहत त्यांनी हा ऐतिहासिक विक्रम केला आहे. अणर्व हा रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी असून आहे. परीक्षा असताना देखील त्याने हे करंजा ते अटल सेतू 24 किलोमीटर अंतर पोहून यशस्वीरित्या पार केले. त्याला जलप्रवासाचे मार्गदर्शन संतोष पाटील यांच्यासह जयेश पाटील राज पाटील, साई पाटील यांनी केले आहे. जल यात्रेसाठी प्रोत्साहन देणारा कल्पेश कोळी यांनी विशेष परिश्रम घेऊन महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
अर्णवची ऐतिहासिक जलयात्रा
