फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक

| माणगाव | प्रतिनिधी |

सिडकोत नोकरी लावतो असे सांगत फिर्यादी यांना खोटे बनावट जॉइनिंग लेटर तयार करून ते फिर्यादीस देऊन फिर्यादीची 1 लाख 83 हजार 550 रुपयांची फसवणूक केली. सदरची घटना दि. 2 ऑगस्ट ते आजपर्यंत फिर्यादी भावेश सुनील मोरे यांच्या फोनवर व माणगाव येथे समक्ष भेटून घडली. या गुन्ह्यातील आरोपींच्या टोळीला माणगाव पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली आहे.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी संकेत अशोक मुंढे (23) रा. वाकडई नगर, ता. माणगाव सध्या रा. चेंबूर मुंबई, अनिकेत बाळाराम तांडेल (25) रा. सुकापूर नवीन पनवेल, सौरभ सदू भोनकर (25) रा. विकास कॉलनी समता नगर माणगाव यांनी व इतर साथीदार यांनी हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींना नवी मुंबई येथून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 75 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सपोनि सतीश अस्वर, पोशि अमोल पोंधे, पोशि नाथा दहिफळे, पोशि रामनाथ डोईफोडे, पोशि शाम शिंदे, पोना अक्षय पाटील, तुषार घरत सायबर सेल यांनी केली.

Exit mobile version