| माणगांव | प्रतिनिधी |
कुंभे, ता. माणगांव येथे सुरु असलेल्या धरण कामावरील लोखंडी रॉडसह अन्य साहित्य चोरणार्या चोरांना पकडण्यात माणगाव पोलिसांना यश आले आहे.
फिर्यादी हे धारिया कन्स्ट्रक्शनमध्ये काम करीत असून, त्यांच्या कंपनीमार्फत कुंभे धरणावर काम सुरु आहे. त्या बांधकामावरील 90 हजार रुपयाचे 1200 किलो वजनाचे टीएमटी स्टील 32 एमएम व 25 एमएम चे लोखंडी रॉड निळ्या रंगाचे टेम्पोत टाकून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबतची तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी किर्तीकुमार गायकवाड, शाम शिंदे, रामनाथ डोईफोडे, दहिफळे, मयूर पाटील, सगरे यांनी गुन्ह्यातील निळ्या रंगाचा टेम्पोचा व चोरट्यांचा शोध घेऊन आरोपी कार्तिक अशोक वाघमारे, चेतन अशोक वाघमार रा. सुकेळी मारूफ रशीद खान रा. पुगाव यांना पकडले.
यामध्ये टाटा टेम्पो व त्यामधे असलेले 90 हजार रुपयाचे 1280 किलो वजनाचे स्टील 32 एमएम 25 एमएम चे लोखंडी रॉड, 2000 रुपये किमतीचा एक लोखंड कापायचे गॅस कटर, 10000 रुपये किमतीचे दोन भरलेले ऑक्सिजन सिलेंडर, 6000 रुपये किमतीचा एक निळ्या रंगाचा एचपी कंपनीचा 19 किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर असा एकूण 8 लाखांचा 8000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू असून गुन्ह्यातील आणखी आरोपीचा शोध सुरू आहे.