अत्याचार करणारा अटक

| पनवेल | प्रतिनिधी |

शहरातील साईनगर परिसरात राहणार्‍या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीशी मैत्री करून त्यानंतर प्रेम संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार करणार्‍या 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. साई नगर परिसरात राहणार्‍या कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री करून ओळख वाढवून त्यानंतर प्रेम संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याने त्याचा त्रास सदर मुलीला होऊ लागल्याने तिनी याबाबतची माहिती आपल्या आईला सांगितली, त्यानुसार तिच्या कुटुंबीयांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करताच आरोपी महम्मद शाह याला ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version