देवदेवतांचे दागिने चोरी करणार्‍या टोळीस अटक

। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई, पालघर येथील मंदिरातील मूर्ती, देवाचे चांदीचे मुकूट, पादुका, दानपेटीत रोख रक्कम चोरी करणारे तसेच पार्क केलेल्या मोटार वाहनांच्या बॅटरी चोरी करणारे सराईत गुन्हेगारांचे टोळीस मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्याकडून अटक करून सुमारे 2 किलो 350 ग्रॅम चांदी व 24 बॅटरी हस्तगत करण्यात आले आहेत.
मुंबई-अहमदाबाद हायवे, सातीवली, पालघर येथील मूर्ती, नवी मुंबई, पालघर येथील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये चोरी केलेले गुन्हे उघडकीस आले असून, नमूद गुन्ह्यातील चोरी केलेले देवदेवतांचे चांदीचे मुकूट, पादुका इत्यादी असे सुमारे 2 किलो 350 ग्रॅम वजनाची चांदी हस्तगत करण्यात आलेली आहे.
नेरुळ परिसरात सापळा लावून आरोपी सुभाष शितलाप्रसाद केवट,जोमू शेखर उर्फ चिरा, तुल्ला, राजू मारूती वंजारे यांना शिताफीने ताब्यात घेतले. तसेच अधिक तपासामध्ये नमूद आरोपी व त्यांचे साथीदारांनी नवी मुंबई परिसरातून पार्क केलेल्या वाहनांच्या 24 बॅटरी हस्तगत करण्यात आलेल्या असून, एकूण त्यांच्याकडून सुमारे 3,25,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर, राजेश गज्जल, ज्ञानेश्‍वर भेदोडकर, जी.डी. देवडे, सतीश सरफरे, आतिष कदम, हरेश भगत, लक्ष्मण कोपरकर, अजय कदम, नितीन जगताप, राहुल वाघ, विजय खरटमोल यांनी केलेली आहे. वरील आरोपींनी चोरी केलेले देवाचे चांदीचे मुकूट वितळून देणारा इसम नामे आसित कालीपदो दास यासदेखील गुन्ह्यात अटक केली.

Exit mobile version