उरणमध्ये 8,444 बाप्पाची प्रतिष्ठापना

| उरण | वार्ताहर |

गणेशोत्सवाचे औचित्य साधून उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात भक्तिभावाने श्री गणेशाचे आगमन झाले आहे. उरण, मोरा-सागरी आणि न्हावा-शेवा या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती 8,426 आणि सार्वजनिक 18 अशा एकूण 8,444 श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आली आहे. यावेळी अनेक गणेश भक्तांनी आप आपल्या घरी चंद्रयानचा देखावा साकारला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाने उघडीप दिल्याने गणेशोत्सवाचे औचित्य साधून अनेक भक्तांनी चिरनेर गावातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी सकाळी 5 वाजल्यापासून मंदिरात गर्दी केली होती.

Exit mobile version