अरुण शेलार यांचे निधन

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव नगरपंचायत हद्दीतील खांदाड गावचे रहिवासी सेवानिवृत्त सहकारी सहाय्यक निबंधक अरुण अर्जुन शेलार यांचे गुरुवार, दि. 13 जून रोजी दुपारी 1.30 वाजता राहते घरी खांदाड माणगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक बहीण, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शेलार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. कै. अरुण शेलार यांचा दशक्रिया विधी शनिवार, दि.22 जून रोजी सोनभैरव मंदिर खांदाड माणगाव येथे, तर उत्तरकार्य विधी मंगळवार, दि. 25 जून रोजी राहते घरी खांदाड माणगाव येथे होणार असल्याचे त्यांचे पुत्र मंदार शेलार यांनी सांगितले.

Exit mobile version