| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार व मार्गदर्शक तथा प्रतिष्ठित व्यापारी विजय मेथा व माणगाव अशोकदादा साबळे विद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन राजन मेथा यांच्या मातोश्री मालती चुनीलाल मेथा यांचे शनिवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी पुणे इस्पितळात वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, जावई, सुना, बारा नातवंडे असा परिवार आहे. रविवार, दि.13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर माणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय अंत्यविधीला उपस्थित होता. कै. मालती मेथा यांचा उत्तरकार्य विधी गुरुवार, दि.24 फेब्रुवारी रोजी राहते घरी माणगाव येथे होणार असल्याचे त्यांचे सुपुत्र विजय मेथा यांनी सांगितले.