| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा नगर पंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष असहल कादिरी यांचे तालुका काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. मुईज शेख यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत अभिनंदन करून म्हसळा शहराची ओळख असलेल्या दिघी नाक्यास बॅ.ए.आर. अंतुले यांचे नाव देण्यात, यावे अशी लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी कोकणचे भाग्य विधाते माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बॅ.ए.आर. अंतुले यांचे सामाजिक आणि राजकीय नेतृत्व तसेच त्यांच्या कार्याचे योगदान लक्षात घेता बॅ. अंतुले यांनी म्हसळा तालुक्यात केलेल्या कामांचे जडणघडणीचा गौरव कायम स्मरणात राहण्यासाठी म्हसळा शहराची प्रामुख्याने ओळख असलेल्या दिघी नाक्याला बॅ.ए.आर. अंतुले यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. नगर पंचायतीच्या कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी दिपल मुंडे यांच्याकडे निवेदन सादर करताना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख यांच्यासमवेत नगरसेवक सुफीयान हलदे, काँग्रेसचे ता. पर्यावरण अध्यक्ष बाबाजान पठाण, महिला शहर अध्यक्षा नाजीमा मुकादम, शहर युवक काँग्रेसचे सुभेदार उपस्थित होते.