रयतच्या सदस्यपदी प्रा. लगारे यांची नियुक्त

। विटा । प्रतिनिधी ।
कवठेएकंद तालुका तासगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव बंडू तथा बी.बी. लगारे यांची रयत शिक्षण संस्थेच्या सेवानिवृत्त आजीव सभासद प्रवर्गातून जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असताना संस्थेच्या आजीव सभासद मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई डॉ. एन.डी. पाटील, आमदार जयंत पाटील, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्ररेणेने तासगाव तालुक्यात सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. प्रा. लगारे यांची निवड झाल्याने परिसरातून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version