तब्बल नऊ कोटींचे कोकेन जप्त

| मुंबई | वृत्तसंस्था |

आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 890 ग्रॅम वजनाचे तब्बल नऊ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. डोक्यावरील वीगमध्ये आणि अंतर्वस्त्रातून लपवून कोकेन तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. अमली पदार्थ लपवण्याच्या या पद्धतीने डिआरआयचे अधिकारी देखील चकित झाले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाने ही (डिआरआय) कारवाई केली आहे. युगांडा देशातील या महिलेला अटक करण्यात आली आहे. 890 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.

Exit mobile version