| पनवेल | वार्ताहर |
खारघर पोलिसांनी हुक्का पार्लरवर धाड टाकून हा हुक्का पार्लर चालवणार्या 6 जणांवर नुकतीच कारवाई केली. या ठिकाणी शासनबंदी असलेला हुक्का सर्रास वापरला जात असल्याचे निदर्शनास आले.
खारघर पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर 10, कोपरा गावालगत ब्लॅक फॉरस्ट हुक्का पार्लर आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेले तंबाखूजन्य पदार्थ वापरून हुक्का ओढला जात असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी एक बनावट ग्राहक पाठवून आधी खात्री करून घेतली. त्यानंतर या हुक्का पार्लरमध्ये वपोनि. दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. प्रदीप आव्हाड, सपोउपनि. फिरोज आगा, पोहवा. सचिन गोसावी, अविनाश गायकवाड, राहुल डावरे यांच्या पथकाने या हुक्का पार्लरवर छापा मारण्याची कारवाई केली. या कारवाईत या पोलीस पथकाला येथे वेगवेगळ्या पद्धतीचे सुगंधित तंबाखूचे डबे, आणि हुक्का पॉट, पाईप्स अन्य सामान असा जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल आढळून आला. त्यावर पोलिसांनी हा सारा मुद्देमाल जप्त करत या प्रकरणी हुक्का पार्लरचा व्यवस्थापक रोहित राजपूत, बुटासिंग जसपाल सिंग सह इतर चार जणांविरोधात कारवाई करत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.