| पुणे | प्रतिनिधी |
सोमवारपासून गोकुळ दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. पुणे, मुंबईत म्हशीचं दूध प्रतिलीटर 74 रुपये, तर उर्वरित महाराष्ट्रात 68 रुपये प्रतिलीटर असणार आहे. तर, गायीच्या दुधातदेखील 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यात 58 रुपये, तर उर्वरित राज्यात 50 रुपये प्रतिलीटर दर होणार आहे.







