। माणगाव । प्रतिनिधी ।
जुन्या वादाच्या रागातून बेकायदेशीर जमाव जमवून हाताबुक्क्याने मारहाण केल्याची घटना माणगाव तालुक्यातील राजिवली येथे घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सविस्तर वृत्त असे की, दि. 3 मे रोजी रात्री 11 वा.च्या सुमारास साक्षीदार हे लघुशंकेरिता गावातील मैदानामध्ये गेले असता आरोपी सदाशिव खडतर, श्रीकांत खडतर, सूर्यकांत खडतर, समीर खडतर, अमित खडतर, नितेश खडतर, दिनेश खडतर, अभिषेक खडतर, राजेश खडतर, संतोष खडतर, सर्व रा. राजिवली यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून बेकायदेशीर जमाव गोळा करून साक्षीदार यांना हाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच भांडणे सोडविण्याकरिता फिर्यादी प्रदीप अर्बन साक्षीदार या गेल्या असता त्यांनासुद्धा हाताबुक्यांनी मारहाण केली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. लहाने करीत आहेत.