प्रशांत नाईक यांच्या सूचनेनुसार भूमिगत विदयुत प्रकल्पाचे काम ड्रीलिंग मेथडने

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

चेंढरे परिसरात भूमिगत विदयुत प्रकल्पाचे काम सुरू असताना रस्त्यांची झालेली अवस्था लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अलिबाग शहरातील भूमिगत विदयुत प्रकल्पाचे काम सुरू करताना ड्रीलिंग मेथडने करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्याशिवाय काम करण्यास मनाई केल्याने सुरू असलेले भूमिगत केबलचे हे काम नियमाप्रमाणे विशीष्ट मशीन्सव्दारे ट्रचिंग व ट्रच लेस जमिनीत आडवे ड्रीलिंग करून (केबल लाइंग एचडीडी मेथड) केले जात आहे. याबद्दल शहरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून सदर कामाला मंजुरी मिळाली आहे.
चेंढरे व वरसोली या ग्रामपंचायत हद्दिमध्ये सदरचे काम जेसीबी लावून खोदकाम करून काम केल्याने रस्त्यांचे नुकसान झाले असल्याचे दिसत आहे. सबंधित अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठक घेत शहरातील भूमिगत विदयुत केबलचे काम मशीन्सव्दारे ट्रचिंग व ट्रच लेस जमिनीत आडवे ड्रीलिंग करून (केबल लाइंग एचडीडी मेथड) करण्याच्या सूचना केल्या. त्या सूचना लक्षात घेवून सदर काम योग्य पद्धतीने सुरू आहे. फक्त जिथे मशिन्स लावून काम करता येणे शक्य नाही तिथेच जेसीबी चा वापर करण्यास सांगितले असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.
महावितरण कंपनीने जागतीक बॅंकेकडे सादर केलेल्या प्रकल्प अहवालास मान्यता दिल्यामुळे राज्य शासनाने दि. 26 जून 2018 व दि. 6 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाने या रू. 89 कोटी 53 लाख 20 हजार 047 इतक्या रक्कमेच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या रक्कमेपैकी शासनाने डिसेंबर 2021 पर्यंत एकूण रू. 24 कोटी 36 लाख 05 हजार 296 इतकी रक्कम लिना पॉवरटेक या कंत्राटदार कंपनीला आदा केली आहे. भूमिगत विदयुत योजना प्रामुख्याने अलिबाग शहर हे समुद्रकिनारी असल्याने चक्रीवादळामुळे विदयुत पोल व विदयूत तारा कोसळून शहरात जिवीत हानी वा वित हानी होवू नये यासाठी राबविण्यांत आली होती.

Exit mobile version