| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अश्विनी बिद्रेच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसातील इनस्पेक्टर अभय कुरुंदकरला दोषी ठरविण्यात आले आहे. लिव-इन पार्टनर अश्विनी बिद्रेची हत्या आणि तिचे तुकडे करून ते फेकून देण्यात होते. पोलिसांच्या तपासानंतर कुरुंदकर याला न्यायालयाने 9 वर्षांनी दोषी ठरवले असून, आज शुक्रवार (दि.11) रोजी सुनावणी होणार असून, त्यांला न्यायालय काय शिक्षा सुनावणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिद्रे यांचे पती आणि मुलगी न्यायालयात हजर झाले आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती.