रिलायन्सतर्फे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे कंपनीमार्फत सीएसआर फंडातून ग्रामपंचायत झोतिरपाडा अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे उद्धघाटन नुकतेच करण्यात आले. ग्रामस्थ चेतन चंद्रकांत जाधव ते गणपत महादेव कुथे यांच्या घराच्या टप्प्यातील अंतर्गत रस्त्याचे दर्जेदार व मजबूत डांबरीकरण करण्यात आले आहे. यावेळीं रिलायन्सचे रमेश धनावडे, महेंद्र टेंबे, वरदा कुलकर्णी, इस्माईल हसनमिया पित्तू, अजिंक्य पाटील, उपसरपंच प्रसाद कुथे, सदस्य दिनेश कुथे, संजय विठोबा भोय, नरेश गोपाळ पाटील, सुरेश पांडुरंग कुथे, मनोहर मधुकर कुथे, दत्तात्रेय तानाजी कुथे, संजय जाधव व ग्रामस्थ झोतिरपाडा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रिलायन्स नागोठणेचे डेप्युटी जनरल मॅनेजर तथा जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी सांगितले की, कंपनी परिसरातील गावांना सीएसआर फंडातून मूलभूत व नागरी सोईसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने आम्ही कायम कटिबद्ध आहोत. गावातील ग्रामस्थांच्या रहदारीचा मुख्य रस्ता सुस्थितीत असावा या हेतूने येथील अंतर्गत रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करण्यात आले आहे, यामुळे ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Exit mobile version