पनवेल | वार्ताहर |
कळंबोली शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच खड्डेमय रस्त्यांतून सुटका होणार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.कळंबोली शहरातील से. 5 परिसरातील साईनगर ते हिंदुस्थान बँक तसेच आजूबाजूच्या अंतर्गत रस्त्यावरील नादुरुस्त असलेल्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी होत असलेल्या या रस्त्यांच्या कामामुळे प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे. कळंबोलीत काही ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे रस्ते खड्डेमुक्त होण्यास मदत मिळणार आहे. संपूर्ण शहरातील रस्ते अशा प्रकारे बनवण्याची गरज आहे. कळंबोलीतील नादुरुस्त असलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याबाबत विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांनी वारंवार संबंधित प्रशासनाला कळवले होते. याची दखल घेत शहरामधील होत असलेल्या डांबरीकरणाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.