। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अमेरिकेने सैन्य काढून घेतल्यापासून अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. तालिबानने अनेक मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतल्या असून, येथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. याच दरम्यान कंधार प्रांतात कव्हरेजसाठी गेलेल्या भारतीय पुलित्झर पुरस्कार विजेत्या फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दीकी यांची गिनती जगातील चांगल्या फोटोग्राफरमध्ये होत होती. ते सध्या आंतरराष्ट्रीय संस्था रिटरसाठी काम करत होते. अफगाणिस्तानमध्ये उसळलेला हिंसाचार कव्हर करण्यासाठी ते येथे गेले होते. कंधारमधील स्पिन बोल्डन भागात हिंसाचार कव्हर करताना त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली.