किरकोळ वादातून युवकावर प्राणघात हल्ला

| दांडगुरी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे येथे शुक्रवारी रात्री किरकोळ कारणातून दोन युवकांमध्ये वाद झाला. त्यामध्ये एका युवकावर चाकूने प्राणघात हल्ला करण्यात आला. त्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. स्वप्निल पाटील असे जखमीचे नाव आहे.

दिवेआगर येथील युवक स्वप्निल पाटील आपल्या मित्रांसमवेत खुजारे येथील संकल्प बार या ठिकाणी आला होता. त्याच दरम्यान दिवेआगर येथील युवक स्वप्निल पिळणकर (37) हा देखील या ठिकाणी आला होता. दोघांमध्ये काही कारणावरुन शाब्दिक वाद झाला. तो वाद इतका टोकाला गेला की, स्वप्निलच्या मानेवर पिळणकर याने चाकूने वार केला. त्यामध्ये स्वप्निल गंभीर जखमी झाला. त्याला तेथील अन्य तरुणांनी तातडीने बोर्लीपंचतन येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर प्रथमोचार करुन अधिक उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेले. पिळकर याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डॉ.प्रसाद ढेबे करीत आहेत.

Exit mobile version