| उरण | वार्ताहर |
उरणमध्ये एका तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. त्यामध्ये सदर तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नवी मुबंईत हलविण्यात आल्याचे समजते.
उरण चारफाटा परिसरात रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तरुणांमध्ये बोलाचाळीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामध्ये ताहा गुलजार शेख (22) या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गळ्यावर धारदार चाकूने वार केल्याने सदर तरुण रक्ताने पूर्णपणे माखलेल्या अवस्थेत उरणमधील दवाखान्यात दाखल झाला होता. परंतु जखम गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नवी मुबंईत हलविण्यात आल्याचे समजते.
या हल्ल्याप्रकरणी उरण पोलिसांनी रुपेश ललन प्रसाद (22) रा- बेलपाडा आकसा-जासई, ता पनवेल याला अटक केली असून दुसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. पुढील तपास उरण पोलीस करीत आहेत.