क्षुल्लक कारणावरुन चॉपरने मारहाण

| पनवेल | प्रतिनिधी |

टपरी चालकाकडून घेतलेल्या सिगारेटच्या पैशांची विचारणा केली असता चॉपरसारख्या हत्याराने वार करून जखमी केल्याप्रकरणी दोघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरहान हसन गोलंदाज हा तळोजा सेक्टर 22 येथे राहात असून, रेल्वे फाटक सेक्टर 21, फेस टू तळोजा येथे त्यांची पान टपरी आहे. यावेळी दोन अनोळखी इसम मोटार स्कुटीवरून आले आणि सिगारेट मागितले. पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि तेथून जाऊ लागले. यावेळी पैशांची मागणी केली असता एका इसमाने फरहान याच्यावर चॉपरसारखे हत्यार काढून डोक्यात आणि कपाळावर वार केला, तर दुसऱ्या इसमाने हाताने मारहाण केली. यात फरहान हा जखमी झाला.

Exit mobile version